गुरुवार, 21 फ़रवरी 2008

शेतक-याचे मनोगत

काऊन गा शामराव खाटीवर झोपला
काय सांगू राजा निसर्गच कोपला
मागच्‍या वर्षी कापसाची गंजी ठेवली भरुन
भाव नोता कापसाले जागीच गेली इरुन
मग या वषी सोयाबीन पेरंल...
अन.. पाणी नाई म्‍हणून जागच्‍या जागी इरलं
लहान पोरगा राजा तापान झोपला
अन काय सांगू राजा निसर्गच कोपला
जहर घ्‍यावं की फासी सूचत नाई मले
अन सारचं कसं इचकुन गेलं काय सांगु तुले
मदत नाई पाणी नाई कस माये होईल
शासनाच अनुदान तेरवीच्‍या कामी येईल
देवई मायासाठी गोळ्या घेवून झोपला
अन काय सांगू राजा निसर्गच कोपला

- प्रा. देशमुख, चंद्रपुर