खरे पाहता मुंबई मधील मराठी माणूस हा मध्यम उत्पन्न गटात किंवा झोपडपट्टीत राहणारा गरीब वर्ग आहे. या वर्गालाच मुंबई बाहेर हद्दपार करण्याचा चंग महाराष्ट्राच्या मराठी सरकारनेच चालविला आहे. 47 वर्षात मुंबईच्या विकासासाठी राबविण्यात आलेल्या योजनांचा हलकासा आढावा जरी घेतला तरी ही गोष्ट लक्षात येईल की मुंबईच्या विकासासाठी राबविलेल्या योजना ह्या केवळ इथल्या गर्भ श्रीमंतासाठीच राबविल्या आहेत. जास्तीत जास्त विकास नीधी केवळ श्रींमतासाठीच वापरला गेला आहे आणि नाव मात्र मुंबईच्या विकास असे ठेवले आहे. गेल्या काही वर्षात विकासाच्या नावावर राबविलेल्या योजना कशा श्रींमंतांसाठी होत्या याची खात्री खालील काही उदाहरणांवरुन लक्षात येईल.
मुंबई ते शांघाय:
शांघाय कसे आहे किंवा ते कुठे आहे हे माझ्या सारख्या अनेक सामान्य जणांसाठी एक गुपितच आहे. मुंबईचे शांघाय होणार म्हणजे नक्की काय होणार हे सुद्धा एक कोडेच आहे. असे असले तरी एक स्वप्न नगरी जिथे खरोखरचं सार काही चकचकित, चमकणारे असेल एवढे मात्र खरे. एकुण काय, तर मुंबईचे शांघाई करणे म्हणजे असे एक महानगर बनवीणे जिथे सोनेरी माणसांचे रुपेरी इमले असतील आणि रंगीबेरंगी लांबच लांब गाड्यांसाठी चंदेरी महामार्ग असतील. अशा या शांघायीरुपी मुंबईत झोपडपट्या किंवा गरीबांना स्थान असणार काय? अर्थातच तसे ते असेल तर ती शांघायी होणारच नाही.
मुंबईचे शांघाई करण्यासाठी म्हणून काही झोपडपट्ट्यांमध्ये राहणा-यानां ईमारती दिल्या. याचे एक उदाहरणार्थ म्हणजे कांजूरमार्ग स्टेशन जवळील रेल्वेलगतच्या झोपड्यांना एमएमआरडीने सात मजली इमारतीं दिल्या पण त्यात खोल्या अगदीच छोट्या व लिफ्टची सोय कुठेच नाही. अशा इमारतींमध्ये ही लोक राहतील तरी कसे? झोपड्यांमधील असुविधांपेक्षा ह्या इमारतीमध्ये राहणे जास्त त्रासदायक आहे, म्हणून ह्या इमारतीमध्ये राहणा-या गरीब लोकांनी त्यांचा इमारतीमधील ब्लाक विकून जात आहेत, असा निर्ष्कश टाटा मूलभूत संशोधन केन्द्राच्या समाजसेवा विभागातील एका अभ्यास गटाने काढला आहे. आता पर्यंत असे समजले जात असे कि ह्या झोपडीतल्या लोकांनाच झोपडीत राहण्याची सवय आहे आणि अधिक पैशांसाठी ही लोक त्यांना मिळालेल्या इमारतीमधील फ्लॅट विकत आहेत. तात्पर्य काय तर.. गरीबांनी बंद फ्लॅटमध्ये तसेच गरीबित रहावे पण झोपडपट्यांमध्ये राहून दारिद्र्याचे प्रदर्शन करु नये. याला म्हणतात शांघायी..
श्रीमंतीचे फ्लायओहरः मोठ मोठी फ्लायओहर बांधून मुंबईचे शांघाई करीत असल्याचा भास करण्यात आला. बहुतेकांना वाटले की हा मुंबईचा विकास आहे. सकाळी सकाळी मुंबई मध्ये बेस्ट बसेस मधून प्रवास करणा-या सामान्य प्रवाशांच्या किती बसेस ह्या करोडोरुपयांच्या टोलेजंग पुलावरुन जातात याचा साधा विचार जरी केला तरी एक गोष्ट लक्षात येते कि हे फ्लायओहर केवळ श्रीमंत लोकांना आलिशान मोटारींतून त्यांच्या कार्पोरेट कार्यालयात अगदी सहजपणे जाता यावेत यासाठीच आहेत. मी गेल्या 15 वर्षापासून मुंबईमध्ये नोकरी करतो पण अख्या आयुष्यात माझी बस कधी ह्या फ्लायओहर वरुन गेल्याचे आठवत नाही. उलट या फ्लायओहर मुळे बेस्ट बसेसला ट्रॅफिकचा सामना करावा लागते असेच चित्र दिसते.
पर्या' 4203465335%5B1%5D.jpg? s1600-h QEnf-iVB500 AAAAAAAAAEI R2DVQaiIlvI _579SUw5f5JU bp3.blogger.com http:>https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIXJybfBExtultQWW-i9vu4u_Z7yUu2H9aZA4uVf64shGv1eRY_3bSWajgvdmGWYjhN5hGmwxM_B3uTlQegiDiWHM_XJa6PbtVD81K3oaBiRYx7cr1JAx7QsYIkWxhtyJTgtLR4vZjppYO/s1600-h/4203465335%5B1%5D.jpg">
अण्णा –भैय्या एक मैय्याः
पुर्वीपासूनच मुंबईमध्ये सर्व जातीधर्माचे, राज्य-प्रांताचे, भिन्न भाषांचे लोक राहत आहेत. मराठी आणि अमराठी हा भेद कधीचाच संपला आहे. हे शहर याआधीच राजकर्त्यांनी बहूभाषी घोषित केले आहे. त्यामुळे भाषेच्या अधिकाराने तसाही मुंबईवरचा अधिकार संपल्यातच जमा आहे. मुंबई आणि उपनगरांचा एवढा व्याप वाढला आहे कि नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, वसई, सारख्या महानगरपालिका व नगरपालिका लगतच्या असल्यामुळे मुंबईतच गणल्या जातात. महानगरपालिकेचा ताळेबंद एखाद्या राज्याचा असावा असा आहे. आज ना उद्या मुंबई राज्य म्हणून ते घोषित करावेच लागेल. श्रीमंतासाठीच अधिक सोई सुविधा दिल्या जात आहेत, त्यामुळे ते श्रीमंताचे राज्य होईल. म्हणजेच शांघाई होईल, आहे असे आपणास वाटत नाही काय?