गुरुवार, 21 फ़रवरी 2008

वि‍द्या आणि‍ शि‍क्षण

विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्‍त गेले वित्‍ताविना शुद्र खचले एवढे अनर्थएका अविद्येने केले... आयुष्‍यभर स्‍वतःला विद्यार्थी म्‍हणवून घेणारे आणि शेवटपर्यंत केवळ पुस्‍तकांच्‍याच सानिध्‍यात राहणारे डॉ.आंबेडकर शिक्षणाची महती विशद करतांना म्‍हणतात ......‘’शिक्षण हे वाघि‍णीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्‍याशिवाय राहत नाही’’ आमच्‍या आदर्शांची महावचने नाही म्‍हटले तरी काही अंशी आम्‍ही पाळलीत... आम्‍ही शिकलो... मोठे झालो... मोठ् मोठ्या पगाराच्‍या नोक-या करीत आहोत.. राहणीमान बदललेय... सुटाबुटात राहू लागलोय... शहरात राहू लागलोय.... फुलेंच्‍या महावचनाचा विचार करता एका अविद्येने काय करु शकते ते लक्षात येते पण फुलेंच्‍या महावचनाचा क्रम जरा उलटाकरुन बघूया म्‍हणजे .. . अविद्येचे अनर्थ टाळण्‍यासाठी आम्‍ही विद्या आत्‍मसात केलीआणि आमच्‍याकडेवित्‍त आले.. म्‍हणजेच चांगल्‍या पगाराच्‍या नोक-या मिळविल्‍यात..थोडीशी का होईना गती आली ... मती किती आली हा प्रश्‍न वादाचा आहे... म्‍हणजे ती आली की नाही हेही गंभीरतेने विचार करुनच ठरवावे लागेल.... दूसरे महत्‍वाचे महावचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे... ते म्‍हणजे शिक्षण हे वाघि णीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्‍या शिवाय राहत नाही..... हजारोंनी शिक्षण घेतले लाखों घेत आहेत मग एवढे सगळे वाघि णीचे दूध पि णारे गुरगुरत का नाही. अहो गुरगुरणे सोडाच साधे खकारण्‍याचा आवाज सुद्धा काढत नाहीत... अपवाद सोडले तर सगळेच कसे मेल्‍या सारखी वाटतात. मला नेहमीच हे कोड सुटलेले नाहीए. एक तर ही वचने खोटी असावीत किंवा आम्‍ही घेतलेले शिक्षण हे शिक्षण तरी नसावे किंवा माणसे खोटी असावीत ह्या तीन पर्याया पैकी नक्‍कीच एक खरा असावा असे वाटते... कोणता ?