गुरुवार, 21 फ़रवरी 2008

नि‍र्धार

पि‍पल्‍स सोशल इन्‍स्‍टि‍ट्यूट, या सामाजि‍क संस्‍थेद्वारे प्रकाशि‍त होणा-या 'पि‍पल्‍स एडवाईसर' या बहुभाषि‍क नि‍यतकालीकाच्‍या ऑक्‍टो-डि‍सेंबर 2007 च्‍या नि‍र्धार दि‍न वि‍शेषांकासाठी लि‍हीलेली गझल 'नि‍र्धार' खाली देत आहोत।


'नि‍र्धार'
धार नि‍र्धाराची प्रबल होत आहे।
लढा नि‍र्धाराचा सफल होत आहे।।द्यृ।।

जून्‍या परंपरांचे पेव जेथे जेथे।
फुलें वि‍चारांची तू पेरताच तेथे।
चि‍रा (चि‍रा) बुरुजांचा नि‍खळतोच आहे।।1।।

चालती नि‍श्‍चयाने पाऊले वज्रांची।
हा पंथ संघर्षाचा ही वाट नि‍तीची।।
गर्ज घोष नारा सबल होत आहे।।2।।

तीच ठेचते पेटून खला खलाही।
अखंड नि‍र्धाराची अटूट श्रृंखला ही।।
एकेक ठि‍णगी मशाल होत आहे।।3।।

मनू रोधाचा हतबल होत आहे।
तो पहा शेवटी बदल होत आहे।।
धार नि‍र्धाराची प्रबल होत आहे।।।
लढा नि‍र्धाराचा सफल होत आहे।।4।।