कपाळ कट्टा लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
कपाळ कट्टा लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

गुरुवार, 21 फ़रवरी 2008

बेडसे लेणे

लेणं किंवा लेणे हा मराठी शब्‍द 'लावण्‍य' या शब्‍दातून निर्माण झाला असून लावण्‍याचा समानार्थी शब्‍द सौंदर्य असा होतो. लेणं लेवूनच रुपाचे सौंदर्य वाढविल्‍या जाते. सह्याद्रीचे सौंदर्य वाढविण्‍याचेच काम ह्या शिल्‍पकृतींनी केले म्‍हणूनच कि काय मराठी भूमीपूत्रांनी ह्या शिल्‍पकृतींना तसचं साजेसं नांव दिले ते म्‍हणजे लेणी किंवा लेणे. महाराष्‍ट्रभर पसरलेल्‍या विशाल डोंगर माळांवर ह्या लेण्‍या नवश्रृंगार केलेल्‍या लावण्‍यवती नववधू सारख्‍या लाजून लपलेल्या आहेत.

काही लोक यांना गुंफा म्‍हणतात किंवा इंग्रजीमध्‍ये Caves म्‍हणतात. परंतू ते तिककेसे पटत नाही. ह्या लेण्‍यांमध्‍ये आदिमानव राहत नव्‍हता तर मानवाच्‍या आध्‍या‍त्मिक, भौतिक, नैसर्गिक, विकासाचा अत्‍युच्‍च बिंदू दर्शविणा-या ह्या लेण्‍यांना गुंफा किंवा Caves संबोधने कसे योग्‍य ठरेल? या नाजूक कलाकुसरींन काठीण्‍यातून कमनियता, परिश्रमातून परमता, भंगतेतून चिरंतनता, चिरंतेतून चैतन्‍यता दाखवून दगडात जीव ओतण्‍याचे काम केले आहे. हे खरेच डोंगरांनी ल्‍यालेलं अद्वितिय लेणंच आहे म्‍हणून भूमीपूत्रांनी केलेलं यांचं नामकरण 'लेणं' हे अगदी सार्थक असेच वाटते.


बेडसे लेणे 'बेडसा' या नावाने सुद्धा ओळखल्‍या जातात. महाराष्‍ट्र पूणे जिल्‍हातील मावळ तालुक्‍यात बेडसे लेणे आहेत. लोणावळा पुणे राष्ट्रिय महामार्गा क्रमांक 4 वर; लोणावळ्यापासून सोमटने फाट्यापर्यंत या व तेथून बेडसे गांवाकडे जाणा-या मार्गाने पुढे गेल्‍यास; जवळच सह्याद्रीच्‍या रांगांमध्‍ये ह्या लेण्‍या आहेत.

ह्या लेण्‍यांचा काळ इसवी सनापूर्वी पहिल्‍या शतकातील सांगीतला जातो. बेडसे येथे दोन प्रमुख्‍य लेण्‍या आहेत ज्‍यामध्‍ये एक चैत्‍यगृह असनू त्‍यामध्‍ये भव्‍य स्‍तुप आहे तर दूसरी लेणी विहार आहे. बेडसेच्‍या लेण्‍या सूर्यमुखी असून पहाटेचे कोवळ्या उन्‍हाची प्रथम किरण ही ह्या सुंदर स्‍तुपावर पडते. प्रभातीच्‍या कोवळ्या उन्‍हात ह्या लेण्‍या बघण्‍यात एक वेगळाच आनंद मिळतो. कार्ले व भाजे या दोन ठिकाणच्‍या लेण्‍यांपेक्षा बेडसेची प्रसिद्धी कमी आहे त्‍यामुळे इथे गर्दी अजिबात नसते. कधी तरी एखाद दूसरी ट्रिप सोडली तर इथे कुणी सहसा जात नाही. पण जर कार्ले भाजेला जात असाल तर नक्‍कीच बेडसेला भेट द्या. एक अपूर्व अशी 2100 वर्षापूर्वीची कोरीव लेणी पाहण्‍याचा आनंद ही अपूर्वच असतो.

कार्ले व भाजे ह्या लेण्‍या ब-याच प्र‍चलित आहेत; त्‍यामुळे त्‍यांची माहिती येथे देणे उचित होणार नाही. जिज्ञासूंनां ही माहिती विकीपेडिया किंवा इतर वेब साईटवर सुद्धा मिळू शकेल. बेडसे एक प्राचिन सुंदर परंतू तरी दूर्लक्षित लेणे आहे म्‍हणून त्‍याचा उल्‍लेख करणे महत्‍वाचे आहे.

उत्‍सव

भारत हा उत्‍सव प्रिय देश आहे असे म्‍हणतात. हे उत्‍सवीपण आता एवढे आततायी आणि उतावळे झाले आहे की बहुतेकांना बरेदा नकोशे झालेले आहे. तरीही हा उत्‍सवांच्‍या नावाखाली हौदोस चालुच आहे. आमच्‍या उत्‍सवाच्‍या कल्‍पना व संकल्‍पना एवढ्या बदललेल्‍या आहेत की त्‍याला उत्‍सव म्‍हणयचा का हा प्रश्‍न पडतो. आमची परंपरा दिव्‍यांची आरास लावून दिवाळी मानायची, शेतात राबणा-या बैलाचे ऋण फेडायचे म्‍हणून पोळा साजरी करण्‍याची असतांना आता मात्र साजरा होणारा प्रत्‍येक दिवस, सण मग दिवाळी असो कि रोझ डे किंवा व्‍हैलेंटाईन असो की होळी, सेलिब्रेट करण्‍याची त-हा ही हौदोसी उत्‍सवांच्‍या व्‍याखेतच मोडत असते. असे उत्‍सव सेलिब्रेट करतांना आम्‍ही नेमके काय करतो ते सुद्धा पाहणे अगत्‍याचे ठरते. उत्‍सव म्‍हटला की अंधारी आणणारी आतषिबाजी किंवा कानाचे पडदे फाडणा-या फटाकांच्‍या स्‍फोट, त्‍यात कानठळ्या बसविणारे अश्‍लील संगीत, भडक रंगांत भपकेदार श्रीमंती दाखविणा-या कापडातील तर्राट झालेली स्‍त्री-पुरुष, अश्‍लील गाण्‍यांच्‍या रिमिक्‍स ठेक्‍यांवर स्‍वतःला सांभाळत परदेशी शिष्‍टाचार पाळत असतात. अशा ह्या उत्‍सवात सहभागी होणा-या प्रत्‍येकाच्‍या मनात रेंगाळणारे विचार ही मात्र किळ्यासांरखेच असतात. आणि शेवटी चमचमीत खाण्‍याने ह्या उत्‍सवांची सांगता ही होते. हे सर्व सांगण्‍याचे कारण म्‍हणजे दरवर्षी येणारा आणि तेवढ्याच जल्‍लोषात साजरा होणार नववर्षाचा दिवस.

ह्या वर्षी नववर्ष साजरे करण्‍यासाठी तरुण 20 ते 25 हजार रुपये तर चाळीशीतील व्‍यक्ति 10 ते 15 हजार रुपये उधळणार, असे सर्वेक्षण करुन काही वर्तमान पत्रांनी बातमी छापली आहे. जर हे सर्वेक्षण खरे असेल आणि खरेच जर सामान्‍यांकडे एवढे रुपये उधळण्‍यासाठी आले असतील तर आमच्‍या सारख्‍यांची हीच चिंता आहे की ह्या उत्‍सवांचा रंग कसा असेल. का केवळ इतरांनी ही बातमी वाचून आपल्‍या खिशातील महिण्‍यासाठी उरलेले 2 ते 3 हजार रुपये ही खर्च करावे हा उद्देश आहे, हे सांगणे कठीण आहे. नववर्षाच्‍या रात्री एका पंचतारांकीत हॉटेलच्‍या बाहेर एका पुरुषांच्‍या गटाने दोन महिलांचा विनयभंग केला. या बाबत कोणतीही तक्रार पोलिस ठाण्‍यात करण्‍यात आली नाही अशी बातमी लोकमत ने सुद्धा प्रकाशित केली आहे. एका इंग्रजी दैनिकाने या घटनेची छायाचित्रे प्रसिद्ध केल्‍यामुळे ही खळबळ उडाली आहे. 70 ते 80 जणांच्‍या गटांने या महिलांचे कपडे फाडून त्‍यांच्‍याशी गैरवर्तन केले आहे, ह्या महिला आपल्‍या मित्रांबरोबर हॉटेल मधून बाहेर पडून जुहू बीचकडे जात होत्‍या. अशीच एक दूसरी बातमी कानपूर शहरातील आहे कि थर्टिफस्‍ट साजरा करीत असतांना मद्यधुंद अवस्‍थेत गोंधळ घालणा-या सुमारे 300 तरुणांना वनवर्षाच्‍या पहिल्‍या पहाटे पोलीस कोठडीची हवा खावी लागली. आणखीही एक बातमी आहे...अहो किती बातम्‍या अशा सांगाव्‍यात. आपण सुद्धा वाचत असताच ना... माझ्यापेक्षा आपल्‍याकडेच अशा बातम्‍यांचे संदर्भ जास्‍त असतील.
एकी कडे नववर्षाचे रंगीबेरंगी फुगे फुटपाथवर विकुन आपली सांज भागविणारे झोपडपट्टीतील मुले, सिग्‍नलवर थांबलेल्‍या गाड्याच्‍या खिडकीजवळ कॅलेंडर विकणा-या बायका, केवळ टिवी समोर रात्री बारा वाजेपर्यंत बसुन न्‍युइअर साजरे करणारे पांढरपेशे मध्‍यम वर्गीय यांना तर उत्‍सव किंवा सण म्‍हणजे काय हेच सांगायची वेळ आली आहे.

इतरांनी त्‍यांचे पैसे कसे खर्च करावे हा जरी ज्‍याचा त्‍याचा प्रश्‍न असला तरी तो जर अशा उत्‍सवी रितीने उधळल्‍या जात असेल तर ते समाज विघातकच आहे, हे वेगळे सांगायची गरज पडू नये. वाईट चाली रितींना कधी तरी कुणी तरी आळा घालने आवश्‍यक असतेच. याचा अर्थ उत्‍सव करु नये असा नव्‍हे, तर उत्‍सवांचे स्‍वरुप बदलण्‍याची ही खरी वेळ आहे. कुठलाही उत्‍सव, सोहळा वाटावा, मनाला चिंतनशिल बनविणारा, भविष्‍याचा वेध घेणारा असावा हे वाटणे सहाजिक आहे. आम्‍ही आमच्‍या पासून, आमच्‍या घरातून जो पर्यंत ख-या उत्‍सवाचा आरंभ करीत नाही तो पर्यंत हा हौदोस चालुच राहणार आहे. आणि येणारी पिढी ही अशीच बेवडी, चमचमित खाण्‍यासाठी पिणारी, व्‍यभिचारी, स्‍वतःपुरतीच संकुचित झालेली असेल हे सांगायला कुण्‍या भटाची गरज नाही.

हरेक आवाज आज अर्ध्‍यात छाटलेला
हरेक माणूस आज आतून फाटलेला
अरे कुणी चोरला उद्याचा पहाट तारा
उजेड येई दिव्‍या दिव्‍यातूनी बाटलेला

असे असले तरीही, हे वर्ष, हौदोसी उत्‍सवांना अंकुश बसविणारे, बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रिद खरे ठरविणारे, सामाजाभिमुख विकासाचे व प्रगतिचे जावो हिच सदिच्‍छा.

वि‍द्या आणि‍ शि‍क्षण

विद्येविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्‍त गेले वित्‍ताविना शुद्र खचले एवढे अनर्थएका अविद्येने केले... आयुष्‍यभर स्‍वतःला विद्यार्थी म्‍हणवून घेणारे आणि शेवटपर्यंत केवळ पुस्‍तकांच्‍याच सानिध्‍यात राहणारे डॉ.आंबेडकर शिक्षणाची महती विशद करतांना म्‍हणतात ......‘’शिक्षण हे वाघि‍णीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्‍याशिवाय राहत नाही’’ आमच्‍या आदर्शांची महावचने नाही म्‍हटले तरी काही अंशी आम्‍ही पाळलीत... आम्‍ही शिकलो... मोठे झालो... मोठ् मोठ्या पगाराच्‍या नोक-या करीत आहोत.. राहणीमान बदललेय... सुटाबुटात राहू लागलोय... शहरात राहू लागलोय.... फुलेंच्‍या महावचनाचा विचार करता एका अविद्येने काय करु शकते ते लक्षात येते पण फुलेंच्‍या महावचनाचा क्रम जरा उलटाकरुन बघूया म्‍हणजे .. . अविद्येचे अनर्थ टाळण्‍यासाठी आम्‍ही विद्या आत्‍मसात केलीआणि आमच्‍याकडेवित्‍त आले.. म्‍हणजेच चांगल्‍या पगाराच्‍या नोक-या मिळविल्‍यात..थोडीशी का होईना गती आली ... मती किती आली हा प्रश्‍न वादाचा आहे... म्‍हणजे ती आली की नाही हेही गंभीरतेने विचार करुनच ठरवावे लागेल.... दूसरे महत्‍वाचे महावचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे... ते म्‍हणजे शिक्षण हे वाघि णीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्‍या शिवाय राहत नाही..... हजारोंनी शिक्षण घेतले लाखों घेत आहेत मग एवढे सगळे वाघि णीचे दूध पि णारे गुरगुरत का नाही. अहो गुरगुरणे सोडाच साधे खकारण्‍याचा आवाज सुद्धा काढत नाहीत... अपवाद सोडले तर सगळेच कसे मेल्‍या सारखी वाटतात. मला नेहमीच हे कोड सुटलेले नाहीए. एक तर ही वचने खोटी असावीत किंवा आम्‍ही घेतलेले शिक्षण हे शिक्षण तरी नसावे किंवा माणसे खोटी असावीत ह्या तीन पर्याया पैकी नक्‍कीच एक खरा असावा असे वाटते... कोणता ?

मुंबई

ऐरणीवरचा मुद्दा :https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjc7wC_JXmVr8as8-cABFos0keflzISqCMDDGp7DZJ9l7rgh0HQz6zxVMDB_YfYdFLAqFFL0LV597ShvF9qGxaXIRTRhFG-lzmOolq7_Ywjv3j5omvdIF_mOJ0RZ6CuWbrKSK_uu014RHEK/s1600-h/2030298879%5B1%5D.jpg"> id="BLOGGER_PHOTO_ID_5143343890929587938" style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjc7wC_JXmVr8as8-cABFos0keflzISqCMDDGp7DZJ9l7rgh0HQz6zxVMDB_YfYdFLAqFFL0LV597ShvF9qGxaXIRTRhFG-lzmOolq7_Ywjv3j5omvdIF_mOJ0RZ6CuWbrKSK_uu014RHEK/s200/2030298879%5B1%5D.jpg" border="0" />1961 पासून मुंबई ही महाराष्‍ट्राची आहे हे दुर्दैवाने सांगावे नव्‍हे तर त्‍या साठी लढावे लागत आहे. महाराष्‍ट्राचा एक स्‍वाभाविक आणि सामाजिक भाग म्‍हणून ही मुंबईवर मराठी छाप आहेच परंतु तरीही त्‍यासाठी आंदोलने, निदर्शने करुन लढावे लागत आहे किवा त्‍यासाठी आंदोलने, निदर्शने करण्‍याची पाळी काही स्‍वार्थी लोकांनी जन-सामान्‍यावर लादली आहे. यात स्‍वार्थ कुणाचा व किती हे सांगण्‍याची ही वेळ नव्‍हे किवा ते सामान्‍यांना माहित नाहीत असेही नव्‍हे. मुंबई महाराष्‍ट्रातून वेगळी करण्‍यात येत आहे असे सांगून हेच स्‍वार्थी लोक लोक-भावनेचे भांडवल करुन स्‍वतःचा काही प्रमाणात फायदा सुद्धा करवून घेतात. म्‍हणजे मुंबई महाराष्‍ट्रा पासून जर वेगळी केली गेली तर मुंबईचा मराठी माणूस कंगाल होईल आणि आता मुंबई महाराष्‍ट्रात असल्‍याने जणू जन-सामान्‍यांचा खुप फायदा होत आहे असेच चित्र उभे केले जाते.
खरे पाहता मुंबई मधील मराठी माणूस हा मध्‍यम उत्‍पन्‍न गटात किंवा झोपडपट्टीत राहणारा गरीब वर्ग आहे. या वर्गालाच मुंबई बाहेर हद्दपार करण्‍याचा चंग महाराष्‍ट्राच्‍या मराठी सरकारनेच चालविला आहे. 47 वर्षात मुंबईच्‍या विकासासाठी राबविण्‍यात आलेल्‍या योजनांचा हलकासा आढावा जरी घेतला तरी ही गोष्‍ट लक्षात येईल की मुंबईच्‍या विकासासाठी राबविलेल्‍या योजना ह्या केवळ इथल्‍या गर्भ श्रीमंतासाठीच राबविल्‍या आहेत. जास्‍तीत जास्‍त विकास नीधी केवळ श्रींमतासाठीच वापरला गेला आहे आणि नाव मात्र मुंबईच्‍या विकास असे ठेवले आहे. गेल्‍या काही वर्षात विकासाच्‍या नावावर राबविलेल्‍या योजना कशा श्रींमंतांसाठी होत्‍या याची खात्री खालील काही उदाहरणांवरुन लक्षात येईल.
मुंबई ते शांघाय:
शांघाय कसे आहे किंवा ते कुठे आहे हे माझ्या सारख्‍या अनेक सामान्‍य जणांसाठी एक गुपितच आहे. मुंबईचे शांघाय होणार म्‍हणजे नक्‍की काय होणार हे सुद्धा एक कोडेच आहे. असे असले तरी एक स्‍वप्‍न नगरी जिथे खरोखरचं सार काही चकचकित, चमकणारे असेल एवढे मात्र खरे. एकुण काय, तर मुंबईचे शांघाई करणे म्‍हणजे असे एक महानगर बनवीणे जिथे सोनेरी माणसांचे रुपेरी इमले असतील आणि रंगीबेरंगी लांबच लांब गाड्यांसाठी चंदेरी महामार्ग असतील. अशा या शांघायीरुपी मुंबईत झोपडपट्या किंवा गरीबांना स्‍थान असणार काय? अर्थातच तसे ते असेल तर ती शांघायी होणारच नाही.
मुंबईचे शांघाई करण्‍यासाठी म्‍हणून काही झोपडपट्ट्यांमध्‍ये राहणा-यानां ईमारती दिल्‍या. याचे एक उदाहरणार्थ म्‍हणजे कांजूरमार्ग स्‍टेशन जवळील रेल्वेलगतच्‍या झोपड्यांना एमएमआरडीने सात मजली इमारतीं दिल्‍या पण त्‍यात खोल्‍या अगदीच छोट्या व लिफ्टची सोय कुठेच नाही. अशा इमारतींमध्‍ये ही लोक राहतील तरी कसे? झोपड्यांमधील असुविधांपेक्षा ह्या इमारतीमध्‍ये राहणे जास्‍त त्रासदायक आहे, म्‍हणून ह्या इमारतीमध्‍ये राहणा-या गरीब लोकांनी त्‍यांचा इमारतीमधील ब्‍लाक विकून जात आहेत, असा निर्ष्‍कश टाटा मूलभूत संशोधन केन्‍द्राच्‍या समाजसेवा विभागातील एका अभ्‍यास गटाने काढला आहे. आता पर्यंत असे समजले जात असे कि ह्या झोपडीतल्‍या लोकांनाच झोपडीत राहण्‍याची सवय आहे आणि अधिक पैशांसाठी ही लोक त्‍यांना मिळालेल्‍या इमारतीमधील फ्लॅट विकत आहेत. तात्‍पर्य काय तर.. गरीबांनी बंद फ्लॅटमध्‍ये तसेच गरीबित रहावे पण झोपडपट्यांमध्‍ये राहून दारिद्र्याचे प्रदर्शन करु नये. याला म्‍हणतात शांघायी..
श्रीमंतीचे फ्लायओहरः मोठ मोठी फ्लायओहर बांधून मुंबईचे शांघाई करीत असल्‍याचा भास करण्‍यात आला. बहुतेकांना वाटले की हा मुंबईचा विकास आहे. सकाळी सकाळी मुंबई मध्‍ये बेस्‍ट बसेस मधून प्रवास करणा-या सामान्‍य प्रवाशांच्‍या किती बसेस ह्या करोडोरुपयांच्‍या टोलेजंग पुलावरुन जातात याचा साधा विचार जरी केला तरी एक गोष्‍ट लक्षात येते कि हे फ्लायओहर केवळ श्रीमंत लोकांना आलिशान मोटारींतून त्‍यांच्‍या कार्पोरेट कार्यालयात अगदी सहजपणे जाता यावेत यासाठीच आहेत. मी गेल्‍या 15 वर्षापासून मुंबईमध्‍ये नोकरी करतो पण अख्‍या आयुष्‍यात माझी बस कधी ह्या फ्लायओहर वरुन गेल्‍याचे आठवत नाही. उलट या फ्लायओहर मुळे बेस्‍ट बसेसला ट्रॅफिकचा सामना करावा लागते असेच चित्र दिसते.
पर्या' 4203465335%5B1%5D.jpg? s1600-h QEnf-iVB500 AAAAAAAAAEI R2DVQaiIlvI _579SUw5f5JU bp3.blogger.com http:>https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIXJybfBExtultQWW-i9vu4u_Z7yUu2H9aZA4uVf64shGv1eRY_3bSWajgvdmGWYjhN5hGmwxM_B3uTlQegiDiWHM_XJa6PbtVD81K3oaBiRYx7cr1JAx7QsYIkWxhtyJTgtLR4vZjppYO/s1600-h/4203465335%5B1%5D.jpg"> id="BLOGGER_PHOTO_ID_5143345252434220786" style="DISPLAY: block; MARGIN: 0px auto 10px; CURSOR: hand; TEXT-ALIGN: center" alt="" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiIXJybfBExtultQWW-i9vu4u_Z7yUu2H9aZA4uVf64shGv1eRY_3bSWajgvdmGWYjhN5hGmwxM_B3uTlQegiDiWHM_XJa6PbtVD81K3oaBiRYx7cr1JAx7QsYIkWxhtyJTgtLR4vZjppYO/s200/4203465335%5B1%5D.jpg" border="0" />अशी ही मुंबईची शांघायी होत आहे. आधिच गरीब असलेल्‍या हा गरीब मराठी माणूस शांघायीच्‍या विकासामध्‍ये अधिक डुबून बुचकळ्या खात आहे. अशा वेळेस मराठी माणूस मंदीरा शिवाय जाणार तरी कुठे? अर्थात तो आता सिद्धीविनायक आणि महालक्ष्‍मीच्‍या मंदीरावर गर्दी करीत आहे. आणि हळूहळू मुंबईपासून आपसूक तूटत आहे. मुंबईमध्‍ये नसला तरी मुंबईच्‍या मंदीरांमध्‍ये मात्र मराठी माणूस दिसतो हा त्‍याचाच पुरावा आहे.
अण्‍णा –भैय्या एक मैय्याः
पुर्वीपासूनच मुंबईमध्‍ये सर्व जातीधर्माचे, राज्‍य-प्रांताचे, भिन्‍न भाषांचे लोक राहत आहेत. मराठी आणि अमराठी हा भेद कधीचाच संपला आहे. हे शहर याआधीच राजकर्त्‍यांनी बहूभाषी घोषित केले आहे. त्‍यामुळे भाषेच्‍या अधिकाराने तसाही मुंबईवरचा अधिकार संपल्‍यातच जमा आहे. मुंबई आणि उपनगरांचा एवढा व्‍याप वाढला आहे कि नवी मुंबई, ठाणे, कल्‍याण-डोंबिवली, अंबरनाथ, उल्‍हासनगर, वसई, सारख्‍या महानगरपालिका व नगरपालिका लगतच्‍या असल्‍यामुळे मुंबईतच गणल्‍या जातात. महानगरपालिकेचा ताळेबंद एखाद्या राज्‍याचा असावा असा आहे. आज ना उद्या मुंबई राज्‍य म्‍हणून ते घोषित करावेच लागेल. श्रीमंतासाठीच अधिक सोई सुविधा दिल्‍या जात आहेत, त्‍यामुळे ते श्रीमंताचे राज्‍य होईल. म्‍हणजेच शांघाई होईल, आहे असे आपणास वाटत नाही काय?