संपादकिय लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं
संपादकिय लेबलों वाले संदेश दिखाए जा रहे हैं. सभी संदेश दिखाएं

बुधवार, 30 जनवरी 2008

बेडसे


लेणं किंवा लेणे हा मराठी शब्‍द 'लावण्‍य' या शब्‍दातून निर्माण झाला असून लावण्‍याचा समानार्थी शब्‍द सौंदर्य असा होतो. लेणं लेवूनच रुपाचे सौंदर्य वाढविल्‍या जाते. सह्याद्रीचे सौंदर्य वाढविण्‍याचेच काम ह्या शिल्‍पकृतींनी केले म्‍हणूनच कि काय मराठी भूमीपूत्रांनी ह्या शिल्‍पकृतींना तसचं साजेसं नांव दिले ते म्‍हणजे लेणी किंवा लेणे. महाराष्‍ट्रभर पसरलेल्‍या विशाल डोंगर माळांवर ह्या लेण्‍या नवश्रृंगार केलेल्‍या लावण्‍यवती नववधू सारख्‍या लाजून लपलेल्या आहेत. काही लोक यांना गुंफा म्‍हणतात किंवा इंग्रजीमध्‍ये Caves म्‍हणतात. परंतू ते तिककेसे पटत नाही. ह्या लेण्‍यांमध्‍ये आदिमानव राहत नव्‍हता तर मानवाच्‍या आध्‍या‍त्मिक, भौतिक, नैसर्गिक, विकासाचा अत्‍युच्‍च बिंदू दर्शविणा-या ह्या लेण्‍यांना गुंफा किंवा Caves संबोधने कसे योग्‍य ठरेल? या नाजूक कलाकुसरींन काठीण्‍यातून कमनियता, परिश्रमातून परमता, भंगतेतून चिरंतनता, चिरंतेतून चैतन्‍यता दाखवून दगडात जीव ओतण्‍याचे काम केले आहे. हे खरेच डोंगरांनी ल्‍यालेलं अद्वितिय लेणंच आहे म्‍हणून भूमीपूत्रांनी केलेलं यांचं नामकरण 'लेणं' हे अगदी सार्थक असेच वाटते. बेडसे लेणे 'बेडसा' या नावाने सुद्धा ओळखल्‍या जातात. महाराष्‍ट्र पूणे जिल्‍हातील मावळ तालुक्‍यात बेडसे लेणे आहेत. लोणावळा पुणे राष्ट्रिय महामार्गा क्रमांक 4 वर; लोणावळ्यापासून सोमटने फाट्यापर्यंत या व तेथून बेडसे गांवाकडे जाणा-या मार्गाने पुढे गेल्‍यास; जवळच सह्याद्रीच्‍या रांगांमध्‍ये ह्या लेण्‍या आहेत. ह्या लेण्‍यांचा काळ इसवी सनापूर्वी पहिल्‍या शतकातील सांगीतला जातो. बेडसे येथे दोन प्रमुख्‍य लेण्‍या आहेत ज्‍यामध्‍ये एक चैत्‍यगृह असनू त्‍यामध्‍ये भव्‍य स्‍तुप आहे तर दूसरी लेणी विहार आहे. बेडसेच्‍या लेण्‍या सूर्यमुखी असून पहाटेचे कोवळ्या उन्‍हाची प्रथम किरण ही ह्या सुंदर स्‍तुपावर पडते. प्रभातीच्‍या कोवळ्या उन्‍हात ह्या लेण्‍या बघण्‍यात एक वेगळाच आनंद मिळतो. कार्ले व भाजे या दोन ठिकाणच्‍या लेण्‍यांपेक्षा बेडसेची प्रसिद्धी कमी आहे त्‍यामुळे इथे गर्दी अजिबात नसते. कधी तरी एखाद दूसरी ट्रिप सोडली तर इथे कुणी सहसा जात नाही. पण जर कार्ले भाजेला जात असाल तर नक्‍कीच बेडसेला भेट द्या. एक अपूर्व अशी 2100 वर्षापूर्वीची कोरीव लेणी पाहण्‍याचा आनंद ही अपूर्वच असतो. कार्ले व भाजे ह्या लेण्‍या ब-याच प्र‍चलित आहेत; त्‍यामुळे त्‍यांची माहिती येथे देणे उचित होणार नाही. जिज्ञासूंनां ही माहिती विकीपेडिया किंवा इतर वेब साईटवर सुद्धा मिळू शकेल. बेडसे एक प्राचिन सुंदर परंतू तरी दूर्लक्षित लेणे आहे म्‍हणून त्‍याचा उल्‍लेख करणे महत्‍वाचे आहे.

गुरुवार, 1 मार्च 2007

विद्या व शिक्षण


विद्येविना मती गेली

मती विना गती गेली

गती विना वित्‍त गेले

वित्‍ताविना शुद्र खचले

एवढे अनर्थएका अविद्येने केले...
आयुष्‍यभर स्‍वतःला विद्यार्थी म्‍हणवून घेणारे आणि शेवटपर्यंत केवळ पुस्‍तकांच्‍याच सानिध्‍यात राहणारे डॉ.आंबेडकर शिक्षणाची महती विशद करतांना म्‍हणतात ......

‘’शिक्षण हे वाघि‍णीचे दूध आहे, जो पितो तो गुरगुरल्‍याशिवाय राहत नाही’’


आमच्‍या आदर्शांची महावचने नाही म्‍हटले तरी काही अंशी आम्‍ही पाळलीत... आम्‍ही शिकलो... मोठे झालो... मोठ् मोठ्या पगाराच्‍या नोक-या करीत आहोत.. राहणीमान बदललेय... सुटाबुटात राहू लागलोय... शहरात राहू लागलोय....

फुलेंच्‍या महावचनाचा विचार करता एका अविद्येने काय करु शकते ते लक्षात येते पण फुलेंच्‍या महावचनाचा क्रम जरा उलटाकरुन बघूया म्‍हणजे .. .

अविद्येचे अनर्थ टाळण्‍यासाठी आम्‍ही विद्या आत्‍मसात केलीआणि आमच्‍याकडेवित्‍त आले.. म्‍हणजेच चांगल्‍या पगाराच्‍या नोक-या मिळविल्‍यात..थोडीशी का होईना गती आली ... मती किती आली हा प्रश्‍न वादाचा आहे... म्‍हणजे ती आली की नाही हेही गंभीरतेने विचार करुनच ठरवावे लागेल....

दूसरे महत्‍वाचे महावचन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आहे... ते म्‍हणजे शिक्षण हे वाघि णीचे दूध आहे आणि जो पितो तो गुरगुरल्‍या शिवाय राहत नाही..... हजारोंनी शिक्षण घेतले लाखों घेत आहेत मग एवढे सगळे वाघि णीचे दूध पि णारे गुरगुरत का नाही. अहो गुरगुरणे सोडाच साधे खकारण्‍याचा आवाज सुद्धा काढत नाहीत.... नरेद्र जाधव, ...... आदिंचे अपवाद सोडले तर सगळेच कसे मेल्‍या सारखी वाटतात.

मला नेहमीच हे कोड सुटलेले नाहीए. एक तर ही वचने खोटी असावीत किंवा आम्‍ही घेतलेले शिक्षण हे शिक्षण तरी नसावे किंवा माणसे खोटी असावीत ह्या तीन पर्याया पैकी नक्‍कीच एक खरा असावा असे वाटते... कोणता ?