गुरुवार, 21 फ़रवरी 2008

आंबडकरी अंगाई

बाळा थांब रे जोजविते
तुला उचलुन कडेवर घेते ।।धृ।।
तो पहा दिवस वर किती आला
आज माझ्या धंद्याला उशिर झाला
येता जाता तुला हलविते
तुला उचलुन कडेवर घेते.....।।1।।

तो पहा पुढा-यांनी दिंडोरा दिला
सर्व जगात हा आवाज झाला
जिकडे तिकडे जयभिम गर्जते
तुला उचलुन कडेवर घेते।।2।।

ते पहा समता सैनिक आले मैदानी
हाती निळा झेंडा तो फडके गगणी
डोंगर माथ्‍याऊन उंच दिसते..
तुला उचलुन कडेवर घेते।।3।।

तो पहा भगवान बुद्ध आपल्‍या घरी
बाबा भिम बैसले त्‍यांच्‍या शेजारी
तुला मला सर्वांना पाहते
तुला उचलुन कडेवर घेते....।।4।।

- वामन कर्डक